नागपूर शहराला स्मार्ट करण्याच्या दिशेने वाटचाल करा :आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निर्देश
Date : 18 Mar 2020
आयुक्तांनी बुधवारी (ता.१८) सकाळी नागपूर स्मार्ट सिटीच्या कार्याचा आढावा घेतला. बैठकीत एनएसएससीडीसीएल चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांच्यासह स्मार्ट सिटीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
नागपूर शहर स्मार्ट करण्याचे व्हिजन त्यांनी यावेळी मांडले. ते म्हणाले, संपूर्ण शहरात वाढत्या वाहनांच्या दृष्टीने मल्टी लेव्हल कार पार्कींगची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शहराच्या विविध भागांतील पार्कींगच्या आरक्षणाचा अभ्यास करून विस्तृत अहवाल तयार करण्याचेही निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. शहरात पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था तयार करण्यासाठी पब्लिक बाईक शेअरींग सिस्टीम सुरू करण्यात यावी. ही संपूर्ण प्रणाली मोबाईल ॲपवर असावी ज्यामुळे नागरिकांना सुलभ आणि सुविधेचे होईल. यासंबंधीची प्रक्रिया तातडीने तयार करण्याचे त्यांनी निर्देशित केले.
याशिवाय शहरातील बाजार भागांचा विकास करण्याची गरज आहे. शहरातील ५ बाजार भाग विकसीत करण्याबाबत लवकरात लवकर अहवाल तयार करण्यात यावे. शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मनपाच्या शहर बस स्थानकावर स्मार्ट किऑक्स लावण्यात आले आहेत. या किऑक्सवर ५० प्रकारच्या नागरी सुविधा तातडीने सुरू करण्यात यावेत. यासंबंधी कार्यवाही करण्याचे मनपा आयुक्तांनी निर्देश दिले.
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पारडी, भरतवाडा, पुनापूर येथे काम सुरू आहेत. ही सर्व कामे वेळेवर पूर्ण होणे आवश्यक असून सर्व कामांना गती देण्याचेही त्यांनी निर्देशित केली. यावेळी त्यांनी बायोमायनिंग प्रकल्पावरही चर्चा केली. सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना त्यामध्ये ‘फ्यूचर सिटी’ ची संकल्पना मांडण्यात आली आहे. म.न.पा. आयुक्त यांनी स्मार्ट सिटीच्या फायदा संपूर्ण शहराला कसा होऊ शकते याबद्दल प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे संबंधितांना सांगितले.