व्दीप नगरची समस्या सोडविण्यासाठी मनपा - नासुप्र ची बैठक घेणार : महापौर
Date : 11 Jun 2021
पूर्व नागपूरातील प्रभाग २५ अंतर्गत व्दीप नगर येथील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता लवकरात-लवकर मनपा व नागपूर सुधार प्रन्यासची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी दिले.
Back To Home Page
महापौरांनी प्रभाग २५ येथील भांडेवाडी जवळील व्दीप नगर ची नुकतीच पाहणी केली. ज्येष्ठ नगरसेवक श्री. पुरुषोत्तम हजारे यांनी महापौरांना या भागाची पाहणी करण्याचे निवेदन दिले होते. भांडेवाडी जवळील खदान मध्ये पावसाळयात पाणी भरुन जाते तसेच गडरलाईन नसल्यामुळे ४०० - ५०० घरात पाणी शिरुन तुंबले जाते. नागरिकांची या समस्येपासून सुटका करण्यासाठी याठिकाणी गडरलाईन टाकण्याची विनंती श्री. हजारे यांनी केली. यावेळी लकडगंज झोन सहाय्यक आयुक्त साधना पाटील, नगरसेवक नरेन्द्र (बाल्या) बोरकर व झोनचे अभियंता उपस्थित होते.