तृतीयपंथी यांच्या लसीकरणाला सुरूवात
विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे वर्मा व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केला शुभारंभ
Date : 19 Jul 2021
याशिवाय व्हेरॉयटी चौकातील लता मंगेशकर हॉस्पिटल परिसरात स्थित सारथी ट्रस्टच्या कार्यालयामध्ये तृतीयपंथीयांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. या लसीकरण केंद्राचा मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, समाजकल्याण तालुका समन्वयक राजेंद्र अवधूत, सारथी ट्रस्टचे अध्यक्ष आनंद चांदराणी, सीईओ निकुंज जोशी, प्रकल्प समन्वयक अमित नगरारे, सामजिक कार्यकर्ता विद्या कांबळे, आचल वर्मा यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये लसीकरण हे एकमेव शस्त्र आहे. लसीकरणाचा प्रभाव आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरण म्हणजे कोव्हिडपासून मुक्तता नव्हे त्यामुळे कुणीही कोव्हिड संदर्भातील नियमांकडे दुर्लक्ष करू नये. लसीकरणानंतरही प्रत्येकाने मास्क लावणे, नियमित हात धुणे, गर्दी टाळणे आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन याप्रसंगी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.
तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या राज्य शासनाच्या योजनेंतर्गत शहरामध्ये तृतीयपंथीयांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी दोन्ही लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी शंभरच्यावर तृतीयपंथी, बेघर आणि दिव्यांगांचे लसीकरण करण्यात आले.