पीओपी मूर्तीसंदर्भात धडक कारवाईत १०८ मूर्ती जप्त
दोन लाख दहा हजार रुपये दंड वसूल
Date : 09 Sep 2021
बंदी असलेल्या पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत गुरुवारी (ता.९) दहाही झोनमध्ये कारवाई करण्यात आली. याअंतर्गत शहरातील १०८ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व मूर्ती विक्रेत्यांकडून दोन लाख दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
Back To Home Page
पीओपी मूर्तीसंदर्भात सुरू असलेल्या कारवाईमध्ये उपद्रव शोध पथकाद्वारे गुरुवारी (ता.९) शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या दहाही झोनमधील २७२ दुकानांची तपासणी करण्यात आली त्यातील १०८ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या. सर्वाधिक ६९ हजार रुपये दंड हनुमाननगर झोन अंतर्गत वसूल करण्यात आला. झोनमधील ५५ दुकानांची तपासणी करून ५३ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या.
या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले व उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी केले. झोन पथकाने कारवाईमध्ये जप्त केलेल्या पीओपी गणेश मूर्ती संबंधित झोनच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या.