योगेंद्र नगरात ‘महापौर नेत्र ज्योती शिबिर’
Date : 11 Sep 2021
यावेळी पश्चिम नागपूरचे माजी आमदार सुधाकर देशमुख, नगरसेवक संजय बंगाले, मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. आरिफा अली, उत्तर भारतीय मोर्चाचे मंडल अध्यक्ष मुकेश मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबिरात सहभागी नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यासाठी महात्मे नेत्रपेढीच्या चमूने नेत्रतपासणी केली. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेले नागरिक पैशाअभावी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करत नाही. यामुळे दृष्टी जाण्याची शक्यता निर्माण होते. पैशाअभावी कोणाची दृष्टी जाऊ नये, या प्रामाणिक भूमिकेतून यावर्षीपासून महापौर नेत्र ज्योती योजना सुरू करण्यात आली. शहरातील विविध भागात शिबिरे घेऊन त्यातून डोळ्यांवर उपचार व आवश्यकता असल्यास मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया महात्मे नेत्रपेढीच्या माध्यमातून करण्यात येते, अशी माहिती नगरसेवक संजय बंगाले यांनी दिली.
माजी आमदार सुधाकर देशमुख यांनीही यावेळी मार्गदर्शन करत, नागपूर महानगरपालिका मुलभूत सोयी देण्यासोबतच नागरिकांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबवित आहे, ही आनंददायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अशा योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शिबिरात उपस्थित शेकडो नागरिकांची नेत्रतपासणी करून त्यांना उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विनोद कन्हेरे, सुनील मित्रा, किशन गावंडे, लक्ष्मण सिंह ठाकुर, संजय पांडे, मुन्ना सिंह ठाकुर, कमलेश पांडे, राकेश तिवारी, मनीष श्रीवास्तव, टीटू ठाकूर, अशोक गांवडे, विनय कडू, विद्याधर मिश्रा, चंद्रशेखर दुबे, भागवत पांडे, दीपक मिश्रा, संतराम यादव, विलास भंडारी आदी कार्यक्रमात उपस्थित होते.