अमृत योजनेंतर्गत बांधण्यात येणा-या जलकुंभाचे भूमिपूजन शुक्रवारी
Date : 21 Oct 2021
शुक्रवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता इंदिरा गांधी सभागृह मैदान, आशीर्वादनगर, बिडीपेठ येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तिनही जलकुंभाच्या कार्याचे भूमिपूजन होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जा तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगरीचे महापौर दयाशंकर तिवारी हे भूषवितील.
कार्यक्रमाला खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार सर्वश्री नागो गाणार, गिरीश व्यास, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेता किशोर कुमेरिया, जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, नेहरूनगर झोन सभापती स्नेहल बिहारे, नगरसेवक नागेश सहारे, नगरसेविका रिता मुळे, नगरसेवक संजय महाकाळकर आदी उपस्थित राहतील.
कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांनी केले आहे.