मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई
Date : 18 Jan 2022
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.
मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २, धरमपेठ झोन अंतर्गत ७, हनुमाननगर झोन अंतर्गत ३, धंतोली झोन अंतर्गत २, नेहरुनगर झोन अंतर्गत २, गांधीबाग झोन अंतर्गत ७, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ३, लकडगंज झोन अंतर्गत ३, आशीनगर झोन अंतर्गत ४ आणि मंगलवारी झोन अंतर्गत ८ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंत ३८०९५ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ९० लक्ष ४७ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.