शहीद शंकर महाले यांना म.न.पा.तर्फे आदरांजली
Date : 19 Jan 2022
भारतीय स्वातंत्र लढयात आपल्या प्राणाची आहुती देण्या-या युवा स्वातंत्रता सेनानी शहीद शंकर महाले यांच्या बलीदान दिवसानिमित्त नागपूर महानगरपालिकातर्फे गांधीबाग झोन सभापती श्रीमती श्रध्दा पाठक यांनी महाल झेंडा चौक स्थित शहीद शंकर महाले यांच्या पूर्णाकृती पुतळयाला माल्यार्पण करुन आदरांजली दिली. यावेळी शहीदाचे कार्याचे स्मरण करुन देण्यात आले.
Back To Home Page
याप्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड .अनिरुध्द धारकर, उपाध्यक्ष अजय बाबर, शेषराव दुरगकर, मारोतराव पोहेकर, वसंत माथने, गजानन महाले, प्रकाश भिसे, अशोक निखाडे, विजय लुटे, विजय माटे, गुलाबराव राऊत, ईश्वर चौधरी, श्रीमती गीताताई महाले आदी उपस्थित होते.