नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मनपाच्या प्रत्येक झोनमध्ये ‘नागरी समस्या निवारण केंद्र’ कार्यान्वित
मनपा आयुक्तांचे झोन सहायक आयुक्तांना आदेश
Date : 12 May 2022
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे हे सर्व कक्ष व समस्या निवारण केंद्र म्हणून सक्षमपणे कार्यान्वित करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी सूचित केले होते. सद्यस्थितीत नागपूर शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या मुलभूत समस्यांमध्येही वाढ होत आहे. या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुलभतेच्या दृष्टीने प्रत्येक झोनमध्ये ‘नागरी समस्या निवारण केंद्र’ सुरू करण्याचे निर्देश प्रशासकाने दिले होते. झोन स्तरावर सदर केंद्र मध्ये नागरिकांकडून प्राप्त होणा-या समस्यांचे प्राधान्याने निवारण करा, असे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना निर्गमित केले आहेत.
नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रत्येक झोनमध्ये कार्यपद्धती निश्चित करण्याचेही मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार झोनमध्ये प्रत्येक झोनमधील नागरी समस्या निवारण केंद्र हे सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत सुरू राहतील. पावसाळा सुरू झाल्यानंतर त्यावेळी निर्गमित होणा-या आदेशानुसार सदर कक्ष पूर्ण वेळ २४ तास कार्यान्वित करण्यात येतील. प्राप्त समस्यांचे तातडीने निवारण व्हावे यासाठी सहायक आयुक्तांनी जातीने देखरेख ठेवणे यासह अनेक बाबी आयुक्तांच्या निर्देशात नमूद करण्यात आलेल्या आहेत.
झोननिहाय नागरी समस्या निवारण केंद्रांचे क्रमांक
अ.क्र. झोनचे नाव दुरध्वनी क्रमांक
1 लक्ष्मीनगर झोन 0712 – 2245028
2 धरमपेठ झोन 0712 – 2567056
3 हनुमाननगर झोन 0712 – 2755589
4 धंतोली झोन 0712 – 2958401
5 नेहरुनगर झोन 0712 – 2700090
6 गांधी महाल झोन 0712 – 2739904
7 सतरंजीपूरा झोन 7030577650
8 लकडगंज झोन 0712 – 2702090
9 आसीनगर झोन 0712 – 2655605
10 मंगळवारी झोन 0712 – 2596903