16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यु दिवस
Date : 12 May 2022
नागपूर महानगरपालिका हिवताप व हत्तीरोग विभागाअंतर्गत 16 मे, 2022 रोजी “राष्ट्रीय डेंग्यु दिवस” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. डेंग्युबाबत जनतेमध्ये जागृता निर्माण व्हावी याकरीता 12 मे,2022 रोजी झोन क्र. 1 ते 5 तसेच 13 मे, 2022 रोजी क्र. 6 ते 10 मध्ये रॅली काढण्यात येणार आहे. तसेच बुधवारी आर.टी.ओ. नागपूर येथे विभागाच्या वतीने कुलर मध्ये गप्पीमासे सोडणे व बारसिलो टॅब्लेट टाकण्यात आल्या.
Back To Home Page
यावेळी हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जस्मीन मुलानी यांनी तेथील कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. नंदनवन पोलिस स्टेशन येथे गप्पीमासे तसेच बारसिलो टॅब्लेट वितरित करण्यात आले. बुधवार बाजार, सक्करदरा येथे कार्यशाळा आयोजित करुन माहिती देण्यात आली. धंतोली गार्डन येथे कार्यशाळा आयोजित करुन गप्पीमासे तसेच बारसिलो टॅब्लेटचे वितरण करण्यात आले. धंतोली झोन येथील नरसिंग विदयालय येथे कार्यशाळेचे आयोजन करुन मार्गदर्शन करण्यात आले. गणेशपेठ बस स्टॅन्ड येथे जनजागृती करुन गप्पीमासे व बारसिलो टॅब्लेटचे वितरण करण्यात आले. मंगळवारी झोन येथील दयानंद पार्क येथे कार्यशाळेचे आयोजन करुन गप्पीमासे व बारसिलो टॅब्लेटचे वितरण करण्यात आले.