बुध्द पोर्णिमा दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद
Date : 13 May 2022
'बुध्द पोर्णिमा' दिनानिमित्त सोमवार दिनांक 16 मे, 2022 ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक 02/09/2018 रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराव क्र.240 दिनांक 02/07/2018 अन्वये मा.आयुक्त यांचे दिनांक 03/08/2018 चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार सोमवार दिनांक 16 मे, 2022 ला 'बुध्द पोर्णिमा' दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल अशी सूचना डॉ.गजेंद्र महल्ले उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग, म.न.पा.यांनी केली आहे.
Back To Home Page