मनपाची प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी विरोधात जप्तीची कारवाई सुरू
Date : 13 May 2022
शुक्रवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रस्त्यावरील फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल मार्केट मधील फुलांच्या दुकानांची तपासणी करून प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई अशीनगर झोन अंतर्गत कळमना मार्केट येथील फळांची दुकाने, लकडगंज झोन अंतर्गत छापरू नगर ते एचबी टाऊन रोडवरील हाथठेले, फळ, भाजी दुकाने तसेच सतरंजीपुरा झोन अंतर्गत प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी विरोधात कारवाई करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करून दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे दुकानदारांनी आपल्या दुकानात प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी ठेऊ नये, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले.
नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सिंगल युज्ड प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी. यांनी केले.