स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
Date : 13 May 2022
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.13) रोजी 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 80 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत रामदासपेठ येथील मल्लीका एक्सीबीशन, तुली एम्पेरियल यांच्याविरुध्द फुटपाथवर प्रदर्शनीतील कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच सिव्हील लाईन्स, ग्रीन पार्क सोसायटी येथील संजय अरोरा यांच्याविरुध्द रस्त्यालगत कालव्यावर मोठया प्रमाणात कचरा, बांधकाम साहित्य टाकल्याबद्दल कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसुल केला.
Back To Home Page
धंतोली झोन अंतर्गत पार्वतीनगर येथील Achut Builders यांच्याविरुध्द रस्त्यालगत बिल्डींग मटेरियल ठेवल्याबद्दल आणि परवानगीशिवाय इलेक्ट्रीक पोलवर बॅनर व होर्डिंग लावल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसुल केला. त्याचप्रमाणे मंगलवारी झोन अंतर्गत कोराडी नाका येथील महालक्ष्मी बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बिल्डींग मटेरियल ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.