सतरंजीपुरा झोन अंतर्गत १५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी जप्त
Date : 14 May 2022
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शनिवारी नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकातर्फे ४ प्रतिष्ठानावर कारवाई करून ४५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये लक्ष्मीनगर, गांधीबाग आणि सतरंजीपुरा या झोनचा समावेश आहे. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत हिंगणा टी पॉईंट वरील फ्युल स्टेशन कॅफे अँड रेस्टॉरंटवर शिळे अन्न रस्त्यालगत टाकल्याप्रकरणी कारवाई करून ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत शाहिद चौक इतवारी येथील मे. नसीम प्लास्टिक दुकानांवर प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल ५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सिंगल युज्ड प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी. यांनी केले.