मनपाची प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी विरोधात जप्तीची कारवाई सुरू
Date : 17 May 2022
मंगळवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रस्त्यावरील फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल मार्केट मधील फुलांच्या दुकानांची तपासणी करून प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई गांधीबाग झोन अंतर्गत शहिद चौक, इतवारी येथील साई क्लॉथ आणि सी.ए.रोड अग्रेसन चौक येथील आशिष किराणा स्टोअर्स या दुकानांवर प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 10 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत मस्कासाथ चौक, इतवारी येथील श्री महालक्ष्मी प्लास्टिक या दुकानांवर प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 10 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे दुकानदारांनी आपल्या दुकानात प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी ठेऊ नये, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले.
नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सिंगल युज्ड प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी. यांनी केले.