स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
Date : 24 Jun 2022
त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत फोर्चुन मॉल, सीताबर्डी येथील आदी मार्केटींग यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसुल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत न्यु सुभेदार ले-आऊट येथील सिध्दी विनायक बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला.
तसेच लकडगंज झोन अंतर्गत देशपांडे ले-आऊट, वर्धमाननगर येथील महेश झाडे यांच्याविरुध्द प्लॉटवरील ड्रेनेज चेंबर तोडून परिसर अस्वच्छ केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. आशिनगर झोन अंतर्गत लष्करीबाग येथील नव निर्माण बिल्डर्स ॲण्ड लँड डेव्हल्पर्स यांच्याविरुध्द इलेक्ट्रीक खांबावर फलक/होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.