नागपूरकरांसाठी तिरंगा सेल्फी स्पर्धा १५ ऑगस्टला
चिमुकल्यांसाठी अभिनव संकल्पनांसह सेल्फी स्पर्धा : विजेत्यांना रोख पुरस्कार
Date : 12 Aug 2022
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, आपल्या घरावर लावलेल्या तिरंग्यासोबत सेल्फी काढून, तो फोटो नागपूर महानगरपालिकेने दिलेल्या लिंकवर अपलोड करायचा आहे. स्पर्धेसाठी तीन वयोगटात सहभाग नोंदविता येणार असून, यात वयवर्षे ७५ च्या वरील नागरिक, ७५ वर्षाखालील नागरिक आणि लहान मुलांचा एक गट असे तीन गट तयार केले आहेत.
स्पर्धेत सहभागी नागरिकांना नागपूर महानगरपालिकेतर्फे रोख पंधरा हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. तिनही गटातील प्रथम क्रमांकासाठी प्रत्येकी ५००० रुपये, द्वितीय क्रमांक प्रत्येकी ३००० रुपये आणि तृतीय क्रमांक प्रत्येकी २००० रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. याशिवाय तिनही गटातून प्रत्येकी पाच स्पर्धकांना १००० रुपये प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
सेल्फी विथ तिरंगा स्पर्धा
- स्पर्धेचे नियम – स्पर्धा सोशल मिडीयावर ऑनलाइन पद्धतीने होईल.
- स्पर्धा फक्त नागपूर महानगरपालिकेअंतर्गत वास्तव्यास असणा-या नागरिकांसाठीच आयोजित केली आहे.
- या संकेतस्थळावर करा नोंदणी – https://www.nmcnagpur.gov.in/harghartiranga/
असा करा फोटो अपलोड
- https://www.nmcnagpur.gov.in/harghartiranga/ या लिंकवर क्लिक करा
- नाव, मोबाईल क्रमांक, जन्मातारीख नोंदवा
- फोटो अपलोड करा
- पत्रव्यवहाराचा पत्ता नोंदवा
- दिलेले कोड नोंदवा
- अर्ज सबमिट करा
स्पर्धेचे बक्षिस –
प्रथम बक्षिस – ५ हजार रुपये, द्वितीय बक्षिस – ३ हजार रुपये, तृतीय बक्षिस – २ हजार रुपये, उत्तेजनार्थ पाच बक्षिस – प्रत्येकी १ हजार रुपये (तिनही गटातील प्रत्येकी पाच स्पर्धकांना).