विद्यार्थ्यांनी केला पथनाट्याद्वारे स्वातंत्र्याचा जागर
मनपातर्फे संविधान चौकात आयोजन
Date : 13 Aug 2022
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग आणि क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे संविधान चौकात शाळकरी मुलांनी पथनाट्याच्या माध्यमाने स्वातंत्र्याचा जागर केला.
या कार्यक्रमाला मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त श्री दीपक कुमार मीना आणि श्री राम जोशी, उपायुक्त श्री रवींद्र भेलावे, शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीती मिश्रीकोटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
रामदासपेठ येथील सोमलवार शाळेचा विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेत शालेयबाह्य मुलांची अवस्था आणि शिक्षणाचा अधिकार संबंधात पथनाट्य सादर केले. टाटा पारसी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरची परिस्थिती चे वर्णन करणारे पथनाट्य प्रस्तुत केले. त्यांनी स्वातंत्र्याचे महत्व नागरिकांना पटवून दिले व स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित केले. मनपाच्या दुर्गा नगर शाळातील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत्याचे सादरीकरण केले. लालबहादूर शास्त्री शाळातील विद्यार्थ्यांनी प्रदूषण आणि सामाजातील वाईट प्रथा, चालीरीती वर पथनाट्य सादर केले.
Back To Home Page
यावेळी क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती दर्शना पंडित आणि शिक्षण विभागाचे विनय बगळे उपस्थित होते. नागरिकांनी या पथनाट्य ला भरघोष प्रतिसाद दिला.