स्वातंत्र्यदिनी १७ ई-बसचे ना. गडकरी व ना. फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
Date : 14 Aug 2022
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होणाऱ्या १७ ई आणि डिजिटल बसचे स्वातंत्र्यदिनी सोमवारी १५ ऑगस्ट २०२२ रोजी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे.
Back To Home Page
सोमवारी (१५ ऑगस्ट) संविधान चौकात सायंकाळी ६ वाजता नागरिकांच्या सुविधेसाठी ई आणि डिजिटल बसचे लोकार्पण होईल. कार्यक्रमाला आमदार सर्वश्री नागो गाणार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांची विशेष उपस्थिती असेल.
कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक श्री. रवींद्र भेलावे आणि परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. रवींद्र पागे यांनी केले आहे.