स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई
Date : 23 Sep 2022
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत गांधीबाग येथील वसंत प्लास्टिक या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत चकना चौक येथील श्री संतोषी स्विटस यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच लकडगंज झोन अंतर्गत लकडगंज येथील साऊथ इंडियन दोसावाला यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत प्लॉट नं.15 हिल रोड, गांधीनगर येथील स्पा व्हिला यांच्याविरुध्द रस्त्यालगत स्पा व्हिला कचरा फेकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत वाठोडा चौक येथील न्यू रंजन बेकरी ॲण्ड रेस्टॉरेन्ट यांच्याविरुध्द रस्त्यालगत रेस्टॉरेन्टचा कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मंगलवारी झोन अंतर्गत बालाजी टाऊन येथील करण वर्मा यांच्याविरुध्द परवानगीशिवाय झाडे तोडून रस्त्यावर फेकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.