मनपा येथे सेवा पंधरवाडा सुरु
नागरिकांचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा : मनपा आयुक्त
Date : 23 Sep 2022
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयादरम्यान, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान, नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आपले सरकार, नागरी सेवा केंद्र व इतर वेबपोर्टलवरील प्रलंबित अर्जांचा जलदगतीने निपटारा होईल.
बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, अति.आयुक्त श्री.राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. रविन्द्र भेलावे, उपायुक्त (घनकचरा) डॉ. गजेन्द्र महल्ले, उपायुक्त (महसूल) श्री. मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त तथा संचालक (माहिती व तंत्रज्ञान) श्री.महेश धामेचा, नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी आणि झोनचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
नागरिकांना पुरविण्यात येणा-या सेवामध्ये अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, कर विभाग, नगररचना विभाग, जलप्रदाय विभाग अंतर्गत येणा-या सेवांमध्ये जन्म प्रमाणपत्र देणे, मृत्यू प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, नव्याने कर आकारणी, नव्याने कर आकारणी (नामांतारणासह), कराची मागणी पत्र तयार करणे, बांधकाम परवाना देणे (निर्णय घेणे), नवीन नळ जोडणी देणे, अग्निशमन ना हरकत दाखला देणे, अग्निशमन अंतिम ना-हरकत दाखला देणे यासारख्या महत्वाचा सेवांचा समावेश आहे.
दैनंदिन कामकाजासोबतच नागरिकांच्या समस्या ऐकुन घेऊन त्या सोडविण्यासाठी क्षेत्रीय अधिका-यांनी प्राधान्य दयावे, असेही निर्देश याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी दिले.