‘पौर्णिमा दिवसा’निमित्त आग्याराम देवी मंदिर चौक परिसरात जनजागृती
एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य
Date : 11 Oct 2022
जनजागृती उपक्रमादरम्यान ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.
माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबविण्यात येते. यावेळी ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, पार्थ जुमडे आदी स्वयंसेवकांनी परिसरात जनजागृती करीत व्यापारी व नागरिकांना त्यांच्या प्रतिष्ठान व घरातील वीज दिवे एक तासांकरिता बंद करण्याची विनंती केली. या मोहिमेत मनपाचे दिलीप वंजारी, हेमंत गौड, दत्तू सुर्यवंशी आदींनीही सहभाग नोंदविला.