‘पौर्णिमा दिवसा’निमित्त व्हेनू कॉर्नर परिसरात जनजागृती
एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य
Date : 11 Jan 2023
जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.
ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संस्थापक श्री. कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टिम लिडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शितल चौधरी, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, पार्थ जुमडे, काजल पिल्ले या संपूर्ण चमूद्वारे जनजागृती कार्य करण्यात आले त्यांना मनपाचे प्रकाश रुद्राकार, शेखर पवार, राजू ढेंगे, दत्तू सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.