स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
Date : 28 Jul 2023
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शक्रवार (ता.28) 08 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ओरा फाईन ज्वेलरी, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अशोका रेस्टॉरेंट, गणेशपेठ, नागपूर यांच्यावर घरातील उपकरणे धुतल्याने फूटपाथ आणि परिसरात पाणी पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जित पिन्नाकल स्पोकन इग्लिश, दिघोरी नरसाळा रोड, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
Back To Home Page