महात्मा गांधी जयंती निमित्त कत्तलखाने व मांस विक्री बंद
Date : 28 Sep 2023
नागपूर २७ ता.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त २ ऑक्टोबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
उपायुक्तांच्या आदेशानुसार, महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासन जीइएन - १०८७/१२८६/सीआर-९३/८७/नवि/१०, दिनांक २२ एप्रिल १९८७ नुसार सोमवार दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ ला नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.