पर्यावरणपूरक धुळवड साजरी करा : मनपाचे आवाहन
Date : 22 Mar 2024
सर्वत्र होळीचा सण येत्या रविवार २४ आणि सोमवार २५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सोमवार २५ मार्च रोजी साजरी होणारी धुळवड पर्यावरण पूरकरित्या साजरी करा, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.
Back To Home Page
सोमवारी धुलीवंदन साजरे करताना पाण्याचा वापर जपून करावा तसेच रासायनिक रंगांचाही वापर करू नये. त्याऐवजी पर्यावरणपूरक हर्बल रंगांचा वापर करावा. होळी हा आनंदाचा सण आहे. रासायनिक रंगांचा वापर करून कुणाला इजा पोहोचवून या उत्सवाला गालबोट लावू नये. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपली ही कृती अत्यंत महत्वाची ठरणार असून नागपूरकर जनतेने याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन मनपा तर्फे केले आहे.