डॉ. दिपक सेलोकर मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त
Date : 29 Mar 2024
नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. दिपक शामराव सेलोकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांनी ११ मार्च रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले. गुरूवारी २८ मार्च रोजी डॉ. सेलोकर हे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झाले.
Back To Home Page
डॉ. दिपक सेलोकर यांच्या नियुक्तीबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. दिपक सेलोकर हे एमबीबीएस एमडी असून ते २०२३ पासून कुटूंब कल्याण संस्था नागपूर येथे प्राध्यापक पदावर कार्यरत होते. या पदावरून त्यांची मनपामध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉ. सेलोकर २०१९ ते २०२३ या कार्यकाळात नागपूर जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते गुरूवार २८ मार्चपासून नागपूर महानगरपालिकेमध्ये रुजू झालेले आहेत.