मतदारांना आवाहन करण्यासाठी मतदान जनजागृती रथ रवाना
शहर आणि जिल्ह्यात विविध भागांमध्ये मतदानासाठी करणार जनजागृती
Date : 03 Apr 2024
मनपा मुख्यालयात उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, कार्यकारी अभियंता श्री सर्वश्री रवींद्र बुंधाडे, विजय गुरुबक्षाणी, श्रीकांत वाईकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.
शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदान करावे, यासाठी संपूर्ण शहरभर रथ जनजागृती करणार आहे. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून यात प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. नागपूर शहरात किमान ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करून नागपूरला प्राविण्य श्रेणीत आणण्यासाठी प्रत्येक मतदाराचे योगदान अमूल्य ठरणार आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या अधिकाराचा उपयोग करून मतदानाचा हक्क नक्की बजावावा, असे देखील आवाहन डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.