कर्तव्यात कसूर करणाऱ्या १४ वाहकांचे आयडी बंद
परिवहन विभागाद्वारे कारवाई : नियमावली भंग करणे भोवले
Date : 08 Apr 2024
नागपूर शहरबस सेवेच्या संचालनाकरीता मे. युनिटी सेक्युरिटी फोर्स व ट्रेनिंग इन्स्टिट्युट नागपूर यांना वाहक पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. एजन्सीद्वारे ‘आपली बस’च्या सेवेकरिता वाहक पुरवठा केला जातो. वाहकांच्या वर्तवणुकीबद्दल मनपाद्वारे एजन्सीला नियमावली देण्यात आली आहे. यामध्ये शहरबस परिचलनाअंतर्गत विना तिकीट प्रवासी वाहून न नेणे, कमी किमतीची तिकीट न देणे, प्रवाश्यांशी सौजन्यपूर्वक वागणूक ठेवणे, कर्तव्यावर असताना मोबाईलचा वापर न करणे या बाबींचा समावेश आहे. वाहकांनी उपरोक्त नियमावलीचे पालन करणे बंधनकारक देखील आहे.
मात्र काही वाहकांद्वारे नियमावलीचा भंग केला जात असल्याचे निदर्शनास आले. वाहकांद्वारे विना तिकीट प्रवाशी वाहून नेणे, कमी किंमतीची तिकीट देणे, प्रवाश्यांशी अयोग्य वर्तवणूक, कर्तव्यावर मोबाईलचा वापर करणे, अशा अनेक गैरवर्तवणूक करण्यात आल्या. संबंधित वाहकांवर परिवहन विभागाद्वारे कारवाई करून त्यांचे आयडी बंद करण्यात आले आहेत. यापुढे देखील कुठल्याही वाहकांचे अशाप्रकारचे वर्तन आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाद्वारे देण्यात आलेला आहे.
या वाहकांवर कारवाई
जाधव (७०५१४) - बर्डी डेपो,
दिपक भोंगे (७०७२९) - बर्डी डेपो.
अश्विन (७२२४६) - बर्डी डेपो.
भुजाडे (७७७४२) - बर्डी डेपो.
मुनेश (७०७४४) - बर्डी डेपो.
नितीन पारधी (७१९४८) - बर्डी डेपो.
संगीता इंगोले (७११५८) - बर्डी डेपो.
निलेश पौनिकर (७०८४९) - बर्डी डेपो.
अनिल चौरे (७०१४०) खापरी डेपो.
मनोहर वसाडे (७०४४८) - खापरी डेपो.
सागर तांदुळकर (७०५४६) - कोराडी डेपो.
किर्ती (७२३५४) - हिंगणा डेपो