मतदान निश्चय शपथ घेऊन केला मतदानाचा निर्धार
मनपाच्या कर्मचाऱ्यांनी दिली मतदानाची ग्वाही
Date : 10 Apr 2024
सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिका मुख्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, श्री मिलींद मेश्राम, श्रीमती रंजना लाडे, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, सा.प्र.वि.चे अधीक्षक श्री श्याम कापसे, सहायक अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम, प्रमोद हिवसे, जितेश धकाते, विजय बगले यांच्यासह मनपाचे सर्व महिला, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा यांनी उपस्थितांना मतदान निश्चय शपथ देत सर्वप्रथम मतदारांनी आपले बूथची माहिती जाणून घ्यावी व इतरांना देखील मदत करावी असे आवाहन केले. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः मतदान करीत इतरांना देखील मतदानासाठी प्रेरित करणार अशी ग्वाही यावेळी दिली.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, स्वीप अंतर्गत मनपाच्या लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन, नेहरूनगर झोन, गांधीबाग झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन, आशीनगर झोन, मंगळवारी झोन अशा सर्व दहाही झोन कार्यालयात संबंधित सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वात मतदान निश्चय शपथ घेण्यात आली. शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदान करावे, तसेच नागपूर शहरात किमान ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट पुर्ण करून नागपूरला प्राविण्य श्रेणीत आणण्यासाठी प्रत्येक मतदाराचे अमुल्य योगदान मिळावे यासाठी मतदारांमध्ये जनजागृती च्या दृष्टीने ही शपथ घेण्यात आली. वर्ष २०१९च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 75 टक्के पर्यंत वाढावी याकरीता विविध झोन स्थरावर शपथ घेत जनजागृती रॅली काढण्यात आली.