सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 40 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 12 Apr 2024
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत १4 प्रकरणांची नोंद करून 5 हजार 6०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०2 प्रकरणांची नोंद करून 2०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून 1600 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास १0 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून 07 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अशा एकूण 40 प्रकरणांची नोंद करून 21 हजार 400 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
मनपा धोरणानुसार दंडात्मक कार्यवाही अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून 40 हजार रुपयाचा दंड वसूल केला. रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविण्यासाठी विद्या नगर काटोल रोड येथुन 10000@& दंड वसुल केला. तसेच इतर कार्रवाई मधुन 30000/- रुपयांची वसुली करण्यात आली.