सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ६२ प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 15 Apr 2024
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत १२ प्रकरणांची नोंद करून ४ हजार ८०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ८०० रुपयांची वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून २ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०८ प्रकरणांची नोंद करून १५ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलाबा/टाकावू कचरा टाकणे प्रथम अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास २३ प्रकरणांची नोंद करून ४ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास १३ प्रकरणांची नोंद करून १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या ०३ प्रकरणांची नोंद
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रविवार (ता. १४) आणि सोमवार (ता.१५) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०३ प्रकरणांची नोंद करून ०३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला तसेच १५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय रस्त्यालगत बांधकाम साहीत्य पसरविणे या अंतर्गत धंतोली झोन येथील मे. एस डी इंफ्राटेक बजाज नगर यांच्यावर कारवाई करीत १० हजार रुपये दंड वसूल केला. असे एकूण ०८ प्रकरणाची नोंद करून ४५ हजार दंड वसूल केला.