मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करिता स्विमेथॉन संपन्न
Date : 16 Apr 2024
मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने मिशन डिस्टिंक्शन 75% च्या अंतर्गत या स्विमेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्व सहभागी जलतरणपटूंना मतदानाबाबतची शपथ देखील देण्यात आली. या स्विनेथॉनमध्ये विविध वयोगटांचा समावेश करण्यात आला होता. सहा तास चाललेल्या या स्विमॅथॉन मधून सर्व जलतरणपटूंनी मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी संदेश दिला.
मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीने आयोजित मिशन डिस्टिंक्शन 75 % अंतर्गत स्विमेथॉन चे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग च्या मानेवाडा -बेसा रोड वरील स्विमिंग पूल वर आयोजन करण्यात आले . विविध गटातील सहभागींना विशेष सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उन्नती शंभरकर व नितिषा शंभरकर या आई व कन्या यांनी सतत दोन तास स्विमिंग केले . पन्नास वर्षावरील वयोगटांमध्ये संजय करिया, अब्दुल जमील व श्रीमती नलिमा धारकर यांनी सतत तीन तास स्विमिंग केले. दिव्यांग स्विमर्स गटातून गुरुदास राऊत, दिलीप भोयर व अक्षय नेवारे तर रामटेक चे ऋषिकेश किंमतकर यांच्या संपूर्ण परिवाराने दोन तास स्विमिंग करून पारिवारिक गटातील प्रथम स्थान प्राप्त केले. आणि या विविध गटातील जलतरणपटूंना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समारोपीय सोहळ्यास ईश्वर देशमुख कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या प्राचार्य डॉ. शारदा नायडू, सुप्रसिद्ध डेंटिस्ट डॉ. तुषार खेरडे, राष्ट्रीय सायकलिस्ट रेणू सिद्धू , माजि क्रीडा सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व अतिथींचे स्वागत जयंत दुबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी श्रीमती माया दुबळे यांनी केले.