सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 73 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 16 Apr 2024
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून 700 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 1600 रुपयांची वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
वर्कशॉप, गॅरेज व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा आशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन 01 हजार रुपायांची वसुली करण्यात आली.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 34 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 8 प्रकरणांची नोंद
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता. 16) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या 3 प्रकरणांची नोंद करून ०३ किलो प्लास्टिक गणेश किराणा, मधुकर किराणा, व रमन डिस्पोसल यांच्या कडुन जप्त करुन १५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय लक्ष्मी नगर झोन अंतर्गत देवनगर एलआयसी कॉलोनी रस्त्यावर कचरा टाकल्यास रु. 5000/-, हनुमान नगर झोन अंतर्गत इम्पीरियल हाईट्स ग्रीन प्लॉट मानेवाडा मध्ये बांधकामाचा कचरा रस्त्यावर पसरविणे या अंतर्गत 10 हजार तसेच धंतोली झोन स्पेस बिल्डर्स यांना सुद्धा 10 हजार दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत उषा क्लासेस झिंगाबाई टाकली आणि मलिका एक्सीबीशन जरीपटका यांना परवानगी न घेता बॅनर लावल्यास 10 हजार दंड वसुल करण्यात आला. असे एकूण ०८ प्रकरणाची नोंद करून 50,000 हजार दंड वसूल केला.