सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 87 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 22 Apr 2024
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून 10 हजार 800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
वैद्यकीय व्यवसायिकांनी बॉयोमेडिकल वेस्ट सर्वसाधारण कऱ्यात टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करुन 10 हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 28 प्रकरणांची नोंद करून 5 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून 18 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा, टाकावु कचरा टाकणे, साठवणे, प्रथम या अंतर्गत 1 प्रकरणची नोंद करुन रु. 1,000/- दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवार (ता. 22) रोजी धरमपेठ झोन अंतर्गत एसेंस इंटरनेशनल स्कुल अमरावती रोड यांना परवानगी न घेता बॅनर लावल्यास 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत पौनीकर बिल्डर्स सती माता मंदीर लालगंज यांना बिल्डींग निर्माण दोरान होणाऱ्या कचरा रोडवर पसरविल्यामुळे 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मास विक्री बंदी असतांना मास विक्री केल्याने इंडियन मटन शॉप, गोधनी रोड कडुन 5 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.