सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 94 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 02 May 2024
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 28 प्रकरणांची नोंद करून 11 हजार 200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 3200 रुपयांची वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 20 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 05 प्रकरणाची नोंद करुन 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 27 प्रकरणांची नोंद करून 5 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 01 प्रकरणांची नोंद
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरवार (ता. 02) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत प्रदीप किराणा शॉप बगडगंज 1 प्रकरणची नोंद करून 5 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत विनायक प्रोप्टी्स हिल व्हिल सोसायटी वाडी, हनुमान झोन अंतर्गत मनोरथ प्लाझा राजश्री नगर मानेवाडा, नेहरुनगर झोन अंतर्गत अनय रेसिडेन्सी उमरेड रोड दिघोरी आणि मंगळवारी झोन अंतर्गत प्रेस्टिज बिल्डर्स एन्ड डेव्लपर्स रस्त्यालगत बांधकाम साहीत्य पसरविणे या अंतर्गत चार प्रतिष्ठांनाकडुन एकुण 40 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. लकडगंज झोन मिश्रा कारखाना भरतवाडा रोड पारडी कारखान्यातील कचरा रस्त्यालगत पसरविणे या अंतर्गत 1 प्रकरणची नोंद करुन 10 हजार रुपायांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण 06 प्रकरणाची नोंद करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.