सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 30 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 25 Jul 2024
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (25) रोजी शोध पथकाने 30 प्रकरणांची नोंद करून 15100 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2500 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 1400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून 5000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Back To Home Page
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ नगर झोन अंतर्गत मे. रेणुका बिल्डर्स यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन मे. श्रीनिवास बिल्डकॉन यांच्या कडून सुध्दा रू. 10,000/- दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. जमो चिवडा यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 3 प्रकरणांची नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला.