सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 66 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 04 Sep 2024
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून 3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. गणेश मुर्ती यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत पंकज मेश्राम यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. रेवतकर मुर्ती भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. माँ. मुर्ती आर्ट, मे. शाहु मुर्ती भंडार, मे. मुर्ती आर्ट यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 30,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. खापेकर किराणा शॉप यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. श्री. गणेश मुर्ती भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. भुयान बिल्डर्स, नदीम अहमद यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल प्रत्येकी रू. 10,000/- असे एकुण रु 20,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला.