सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 48 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 05 Sep 2024
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 1,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून 5,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. संदीप पुंसे यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. शाहु गणेश मुर्ती भंडार व मे. देवांश आर्ट यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. नेहरुनगर झोन अंतर्गत महेश सहारे व मे. सत्यम मुर्ती आर्ट यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. नारायणी आर्ट, निखिल शोसटे, मे. राजु मुर्ती भंडार, महेश गायकवाड, मे. सागर मुर्ती आर्ट यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 50,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. विश्वास ट्रेडर्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत आशु र्निगुलकर, मोहीत गारगी यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. आशीनगर झोन अंतर्गत मे. बालाजी मुर्ती आर्ट, मे. शाहु मुर्ती भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत पंकज मेश्राम, मे. श्री. आर्ट गणेश, मे. नव दुर्गा मुर्ती सेंटर यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 30,000/- चे दंड वसुल करण्यात आले.