सौम्या शर्मा यांनी स्वीकारली स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी
Date : 05 Sep 2024
तत्पूर्वी त्यांनी नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्रीमती शर्मा यांनी देखील नागपूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि श्रीमती आंचल गोयल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१८ या वर्षीच्या बॅचच्या अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांनी नागपूर स्मार्ट सिटीपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले आहे. त्यांनी नांदेड येथे जिल्हा प्रशासनामध्ये सुद्धा काम केले आहे. विधी विद्यापीठ, दिल्ली येथून पदवी प्राप्त श्रीमती सौम्या शर्मा यांनी नागपूर जिल्हा परिषद येथे मोठ्या संख्येत पदभरती केली होती. त्यांनी नागपूर जिल्हा परिषद येथे शिक्षण , महिला व बाल कल्याण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केली आहे. गुरुवारी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड चा पदभार स्वीकारल्या नंतर त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली आणि स्मार्ट सिटीचा विविध कामाबद्दल माहिती प्राप्त करून घेतली.