5 व्या दिवशी 2942 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन
Date : 12 Sep 2024
नागपूर महानगरपालिकातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थान विभागातर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
Back To Home Page
डॉ. गजेन्द्र महल्ले, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी सांगितले की, पांचव्या दिवशी 2942 श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन विविध ठिकाणी करण्यात आले. यामध्ये पीओपीची मूर्ती फक्त 69 होती आणि मातीच्या मूर्ती 2873 होती. नागरिकांनी मोठया संख्येत मातीच्या श्रीगणेश मूर्तीची स्थापना यावेळेस केली आहे. त्यांनी सांगितले की, ग्रीन व्हीजील फाउंडेशन तर्फे फुटाळा तलावात श्रीगणेश विसर्जन मध्ये मनपाला सहकार्य प्राप्त होत आहे.