मनपाच्या “आपदा मित्र” उपक्रमासाठी एकूण ९२६ अर्ज प्राप्त
Date : 13 Sep 2024
उपक्रमाबद्दल माहिती देत मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे यांनी सांगितले की, केंद्र शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशानुसार शहरात 'आपदा मित्र' ची नियुक्ती करण्याचे प्रस्तावित आहे. शहरातील दहाही झोनमध्ये प्रत्येकी १५ याप्रमाणे एकूण १५० 'आपदा मित्र' ची निवड केली जाणार आहे.
शहरात उद्भवणाऱ्या आपत्ती व अतिवृष्टी समयी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी “आपदा मित्र” मदत करणार आहेत. मनपाद्वारे उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार एकूण १५० पदांकरिता ९२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातून आपदा मित्र यांची निवड करण्यात येणार असून, या स्वयंसेवकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करून प्रशिक्षण प्रदान करण्यात येणार आहे. यात त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या संकल्पनांची ओळख करून दिली जाईल. तसेच शोध आणि बचाव कार्याविषयी प्रशिक्षण, अग्निशामक यंत्रांची माहिती, मूलभूत प्रथमोपचार, लाईफ सपोर्ट इत्यादींविषयी प्रशिक्षण प्रदान करण्यात येणार आहे.
आपदा मित्र या उपक्रमाकरिता पात्रतेसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. शारीरिक क्षमतेनुसार पात्र असलेल्या अर्जदारांना निवडले जाईल व त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत दिले जाईल. शारीरिक निकष हा सर्वात महत्त्वाचा पात्रता निकषांपैकी एक आहे. उपक्रमानुसार आपदा मित्र उपक्रमाच्या अर्जदारांना वैद्यकीय प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे. " >
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात शहरात “आपदा मित्र” उपक्रम राबविण्यात येत आहे.
उपक्रमाबद्दल माहिती देत मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे यांनी सांगितले की, केंद्र शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशानुसार शहरात 'आपदा मित्र' ची नियुक्ती करण्याचे प्रस्तावित आहे. शहरातील दहाही झोनमध्ये प्रत्येकी १५ याप्रमाणे एकूण १५० 'आपदा मित्र' ची निवड केली जाणार आहे.
शहरात उद्भवणाऱ्या आपत्ती व अतिवृष्टी समयी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी “आपदा मित्र” मदत करणार आहेत. मनपाद्वारे उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार एकूण १५० पदांकरिता ९२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातून आपदा मित्र यांची निवड करण्यात येणार असून, या स्वयंसेवकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करून प्रशिक्षण प्रदान करण्यात येणार आहे. यात त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या संकल्पनांची ओळख करून दिली जाईल. तसेच शोध आणि बचाव कार्याविषयी प्रशिक्षण, अग्निशामक यंत्रांची माहिती, मूलभूत प्रथमोपचार, लाईफ सपोर्ट इत्यादींविषयी प्रशिक्षण प्रदान करण्यात येणार आहे.
आपदा मित्र या उपक्रमाकरिता पात्रतेसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. शारीरिक क्षमतेनुसार पात्र असलेल्या अर्जदारांना निवडले जाईल व त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत दिले जाईल. शारीरिक निकष हा सर्वात महत्त्वाचा पात्रता निकषांपैकी एक आहे. उपक्रमानुसार आपदा मित्र उपक्रमाच्या अर्जदारांना वैद्यकीय प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे.