स्वच्छ नागपूर साकारण्यासाठी 'स्वच्छता ही सेवा" अभियानात सक्रिय सहभाग नोंदवा
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन
Date : 16 Sep 2024
नागपूर महानगरपलिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात मनपाच्या दहाही झोन निहाय हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानांतर्गत स्वच्छतापूरक जीवनशैली अंगिकारुन आणि स्वच्छतेला सांस्कृतिक मूल्य म्हणून महत्त्व दिले जाणार आहे.
या अभियानाद्वारे नागरिकांना स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे, अभियाना दरम्यान विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. ज्यात अभियानाची भव्यता आणि जनजागृती करणारी भव्य रांगोळी, मनपाच्या दहाही झोन मध्ये शुन्य कचरा संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रम घेण्यात येतील. तसेच शायेल व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी स्वच्छता संवाद, स्वच्छता रॅली, मॅरेथॉन, सायक्लोथॉन, एक मेड मॉ के नाम, सफाई मित्र सुरक्षा शिबिर, विविध ठिकाणी सौदार्यीकरण, स्वच्छता फूड उत्स्व स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आदी विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. याशिवाय स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे. तरी आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारणार्या या विविध उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत अभियान यशस्वी करावे असे आवाहनही आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.