नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (26) रोजी शोध पथकाने 85 प्रकरणांची नोंद करून 60,100/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 34 प्रकरणांची नोंद करून 13,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 500/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 3,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 3,0000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5,000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 24 प्रकरणांची नोंद करून 4,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 2 प्रकरणांची नोंद करून 2,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.
तसेच तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. गोल्डन ऐनक्लेव यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन झोन अंतर्गत मे. गुप्ता इन्फाट्रेक यांनी बांधकाम साहित्य जवळच्या रस्त्याच्या कडेला पसरवल्यामुळे यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 2,5000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन झोन अंतर्गत मे. अभय मौर्या यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल यांच्यावर रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. ज्ञान जोत्यि यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. जैन किराणा शॉप यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल यांच्यावर रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 4,5000/- दंड वसूल केला.