स्वच्छता ही सेवा' ला अनुसरून नागपूरकरांनी श्रमदानातून दिला स्वच्छतेचा संदेश
मनपाच्या भव्य स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद - स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने श्रमदान
Date : 29 Sep 2024
स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता' या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व श्री. अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत सहभाग नोंदवीत मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणाऱ्या शांतीनगर म्हाडा कॉलनी परिसरात श्रमदान केले. मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी स्वतः परिसर झाडूने स्वच्छ केला. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी मनपाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, झोनल स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांनी संबंधित झोन मध्ये श्रमदान करीत मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. यात प्लॉगर्स ग्रुप,ग्रीन व्हिजील फाउंडेशन,तेजस्विनी लिडर्स क्लब,सेव्हिंग ड्रिम्ज फाउंडेशन,किंग कोब्रा ऑर्गनॉयजेशन,वार्ड समस्या निवारण समिती,जनसेवा स्वयंसेवा महिला बचत गट,तेजस्विनी मंच,फिल गुड फाउंडेशन,वेद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने श्रमदान करण्यात आले.
मनपाद्वारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत जेल परिसर, रहाटे चौक ते दीक्षाभूमी येथे स्वच्छता करण्यात आली यात प्लॉगर्स ग्रुप या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळाले. तर धरमपेठ झोन अंतर्गत महाराजबाग चौक ते लायब्ररी सिमेंट रोड येथे स्वच्छता करण्यात आली यात ग्रीन व्हिजील फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळाले. हनुमान नगर झोन अंतर्गत जुनी शुक्रवारी येथे स्वच्छता करण्यात आली यात तेजस्विनी लिडर्स क्लब या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळाले, धंतोली झोन अंतर्गत चनाटोली ते मैत्री विहार रामबाग येथे स्वच्छता करण्यात आली यात सेव्हिंग ड्रिम्ज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले, नेहरूनगर झोन अंतर्गत छोटा ताजबाग येथे स्वच्छता करण्यात आली यात किंग कोब्रा ऑर्गनॉयजेशन या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळाले. गांधीबाग झोन अंतर्गत राका चौक ते बडकस चौक येथे स्वच्छता करण्यात आली यात वार्ड समस्या निवारण समिती या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळाले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत म्हाडा कॉलनी येथे स्वच्छता करण्यात आली यात जनसेवा स्वयंसेवा महिला बचत गट या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळाले. लकडगंज झोन अंतर्गत अनिल बार समोर शास्त्री नगर चौक, भंडारा रोड येथे स्वच्छता करण्यात आली यात तेजस्विनी मंच या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले, आशीनगर झोन अंतर्गत टिपू सुलतान चौक येथे स्वच्छता करण्यात आली यात फिल गुड फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळाले. तर मंगळवारी झोन अंतर्गत जरीपटका जिंजर मॉल चौक येथे स्वच्छता करण्यात आली यात वेद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले.
रस्त्यावरील पालापाचोळा, झाडाच्या फांद्या आदी उचलून कचरा गाडीत टाकण्यात आले. तसेच स्वच्छ करण्यात आलेला परिसर पुन्हा अस्वच्छ होवू नये, लोक तिथे पुन्हा कचरा टाकू नये म्हणून त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह संबंधित झोनचे सहायक आयुक्त सर्वश्री मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, नरेंद्र बावनकर,हरीश राउत, घनशाम पंधरे, गणेश राठोड, विकास रायबोले अशोक घरोटे, प्रमोद वानखेडे, विजय थूल यांच्यासह स्वच्छता ब्रँड अँबेसिडर श्री.कौस्तुभ चॅटर्जी, श्रीमती किरण मुंदडा, श्री.अरविंद रतुडी यांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली. यावेळी मनपाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंडादे, विजय गुरुबक्षांनी,
विभागीय अधिकारी डॉ. राजीव राजुरकर, सर्व स्वच्छता निरीक्षक श्री रविकांत डेलिकर, श्री अर्जुन दखा, श्री इशांत हथिबेड श्री. लंगोटे श्री. अजय मलिक,श्री विनय पाटिल, श्री मनोज खरे, श्री लखनजी श्री अंकित पाल, श्री सुरेश खरे, स्वच्छता अधिकारी रामटेके, यांच्यासह नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी या सर्वांनी स्वच्छतेसाठी श्रमदानात सक्रियपणे सहभाग नोंदविला.