स्वच्छता दुतांसाठी "मन की सफाई" कार्यक्रम आज
Date : 30 Sep 2024
स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता' या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व श्री. अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
यातील मन की सफाई: स्वच्छता संग मन का उत्सव 2024 हा उपक्रम असून, कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांसाठी संगीतमय संध्या, नृत्य व नाट्य सादरीकरणासह सफाई कर्मचाऱ्यांना तणावमुक्त कसे राहावे याचे मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम झीरो वेस्ट संकल्पनेवर आयोजित केला जाणार आहे. तरी मोठ्या संख्येत सफाई कर्मचार्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. " >
कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा चांडक, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, सर्व सहायक आयुक्त, दहाही झोनचे झोनल अधिकारी, स्वच्छता ब्रँड अँबेसिडर व सफाई कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता' या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व श्री. अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
यातील मन की सफाई: स्वच्छता संग मन का उत्सव 2024 हा उपक्रम असून, कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांसाठी संगीतमय संध्या, नृत्य व नाट्य सादरीकरणासह सफाई कर्मचाऱ्यांना तणावमुक्त कसे राहावे याचे मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम झीरो वेस्ट संकल्पनेवर आयोजित केला जाणार आहे. तरी मोठ्या संख्येत सफाई कर्मचार्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.