मनपा कर्मचाऱ्यांनी मानले आयुक्तांचे आभार
वाहतूक व महागाई भत्ता थकबाकी आणि पदोन्नतीबाबत निर्णयाचे केले स्वागत
Date : 01 Oct 2024
नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता आणि महागाई भत्त्याची थकबाकी तसेच पदोन्नती बाबत घेतलेल्या सकारात्मक निर्णयाकरिता मनपा कर्मचाऱ्यांनी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे आभार मानले. मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, मनपा आयुक्तांचे स्वीय सहायक श्री. प्रमोद हिवसे, श्री. जितेश धकाते, मुकेश मोरे यांनी मनपा आयुक्तांना पुष्पगुच्छ देउन त्यांचे आभार मानले.
Back To Home Page
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा वाहतूक भत्ता व महागाई भत्ता थकबाकी आणि पदोन्नतीबाबत प्रलंबित विषयावर सकारात्मक विचार करून निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे मनपा कर्मचाऱ्यांनी स्वागत करीत आनंद व्यक्त केला.
मनपा आयुक्तांना पुष्पगुच्छ देताना त्यांच्या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांनी आभार मानले. यावेळी सर्वश्री अमोल तपासे, कमलेश झंझाड, शुभम राऊत, मनीष डुमरे, राजू लोणारे, गजानन जाधव, शैलेश जांभुळकर, राजेश लोहितकर, कीर्ती उबाळे, कैलाश लांडे, अनिल चव्हाण यांच्यासह आस्थापना विभाग, आयुक्त कार्यालय, उपायुक्त कार्यालयासह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.