नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 50 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणा-यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (०१) रोजी शोध पथकाने ८९ प्रकरणांची नोंद करून ६६,८००/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २९ प्रकरणांची नोंद करून ११,६००/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून १००/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ८ प्रकरणांची नोंद करून ३,२००/- रुपयांची वसुली करण्यात आली, वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १२ प्रकरणांची नोंद करून १७,५००/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून १,००० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत्त १ प्रकरणांची नोंद करून ५००० रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास २२ प्रकरणांची नोंद करून ४,४००/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास १४ प्रकरणांची नोंद करून १४,०००/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी दिलेल्या दि. ०३.०७.२०१७ च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून १०,००० रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. मोती महाल रेस्टॉरेंट यांनी चेंबर ब्लॉक केल्याबद्दल रू. १०,०००/- चे दंड वसुल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. गुप्ता बिल्डर्स यांनी यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. ५,०००/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. नेहरू नगर झोन अंतर्गत मे. दास मिठाई भंडार यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. साई मिष्ठान भंडार यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला, सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. वासनिक किराणा यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने ५ प्रकरणांची नोंद करून रू. ३०,०००/- दंड वसूल केला.