सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 51 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 16 Oct 2024
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत श्री. सुनिल बजाज, इन्कम टॅक्स कॉलनी, यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत श्री. राहूल पिसे (बिल्डर्स) यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. रघुविर रेस्टॉरेंट यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच मे. एल एन गुप्ता ट्रान्सर्पोर्ट कंपनी यांनी वाहन दुरुस्ती करण्याकरिता फुटपाथ अतिक्रमीत केल्याने मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रू. 30,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोन अंतर्गत श्री. देवेंन्द्र पटेल यांनी घराच्या मोकळ्या जागेवर अस्वच्छता पसरल्याने मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. सागर किराणा स्टोअर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन मे. ट्रु वॅल्यु प्रोजेक्ट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू. 70,000/- दंड वसूल केला.