महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त म.न.पा. व्दारा अभिवादन
Date : 17 Oct 2024
वाल्मीकी रामायण या महाकाव्याव्दारे प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये आदर्श राज्याची संकल्पना साकारणारे रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील महर्षी वाल्मीकी यांच्या तैलचित्राला अति. आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
Back To Home Page
या प्रसंगी उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त श्री. गजेंद्र महल्ले, अधिक्षक श्री. राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, प्रमोद हिवसे, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर तसेच वाल्मीकी महासभेचे मोतीलाल जनवारे, प्रकाश चमके, शशी सारवान, राजा मस्ते, दुर्गेश खरे, राजेश हातिबेड, अनिल बागडे, अजित जाधव, आदी उपस्थित होते.